आज राज्यातल्या शाळा सुरू, सरकारची नवी नियमावली जाहीर

राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. 

Updated: Oct 4, 2021, 08:22 AM IST
 आज राज्यातल्या शाळा सुरू, सरकारची नवी नियमावली जाहीर title=

मुंबई : राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे. आजपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते इयत्ता 12 वीपर्यंतचे वर्ग भरतील तर शहरी भागात इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू होत आहेत.

 राज्य सरकारने शाळांसाठी नवी नियमावली तयार केलीय. राज्य सरकारने शाळांना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा कऱण्यास सांगितलं आहे.

 मुंबईत केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणारेय. कोरोनासंदर्भातले नियम पाळले नाहीत, तर कठोर कारवाईचा इशारा मुंबई महापालिकेनं दिलाय. मुंबईत तीन तास शाळा भरणारेय. 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.राज्यातील कोविड संक्रमण स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आला.