कर्ज फेडण्यासाठी बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बनवून विद्यार्थाचे अपहरण

सोशल मिडीयावर बनावट अकाउंट बनवून फसवणुकीचे प्रकार आजकाल नेहमीचेच... मात्र एका तरुणाने कर्ज चुकवण्याकरिता बनावट वॉट्स ऍप अकाऊंट बनवून चक्क एका अल्पवयीन विद्यार्थाचे अपहरण केले... मात्र पोलिसांनी वेळीच तपासाची चक्रे फिरवत अपहरण कर्त्यांना अटक केली.

Updated: Mar 9, 2018, 11:56 AM IST
कर्ज फेडण्यासाठी बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बनवून विद्यार्थाचे अपहरण title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : सोशल मिडीयावर बनावट अकाउंट बनवून फसवणुकीचे प्रकार आजकाल नेहमीचेच... मात्र एका तरुणाने कर्ज चुकवण्याकरिता बनावट वॉट्स ऍप अकाऊंट बनवून चक्क एका अल्पवयीन विद्यार्थाचे अपहरण केले... मात्र पोलिसांनी वेळीच तपासाची चक्रे फिरवत अपहरण कर्त्यांना अटक केली.

मयूरचं अपहरण

नागपूरच्या सिव्हील लाईन परिसरातील वॉकर रोडवर रोज सकाळ - संध्याकाळी या रस्त्यावर वॉकिंग करणा-यांची मोठी संख्या असते... मात्र २७ फेब्रुवारीला याच रस्त्यावर एक अनपेक्षित घटना घडली... मयूर देऊळकर या बारावीच्या विद्यार्थाचे अपहरण करण्यात आले...मयूर देऊळकरच्या वडिलांना फोनवर या अपहरणाची माहिती मिळाली आणि मयूरच्या मोबदल्यात १ लाख २० हजार खंडणीची मागणी करण्यात आली... 

पोलिसात तक्रार

अपहृत मयूरच्या वडिलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली... पोलिसांनी वेळीच अपहरणाच्या या घटनेची दखल घेतली... अपहृत मयूरच्या वडिलांना सोबत घेऊन अपहरणकर्त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेले... मात्र अपहरण करते दरवेळी पत्ता बदलवून दुसऱ्या ठिकाणी बोलवत होते.

आरोपी काय करतात?

सीसीटीव्ही आणि सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हे शाखा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली... सुरज कृष्णापुरकर, शेख मतीन आणि राज खनके असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत... यापैकी सुरज हा या अपहरणाचा मास्टरमाईंड असून तो ठाणे येथे वेटर चे काम करतो. शेख मतीन हा रिलायंस फिल्म्स मध्ये स्पॉट बॉय आहे तर राज खनके हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे...  

किती होते कर्ज?

आरोपी सुरजवर ४० हजाराचे कर्ज होते... हे कर्ज फेडण्यासाठी त्याने हे अपहरण घडवले व याकरिता शेख मातीन व राज खनके ला सोबत घेतले...

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून ब्लॅकमेल

काजल बावणेच्या नावाने बनावट व्हॉटसएप अकाऊंट सुरु करत मयूरला जाळ्यात ओढत मयूरला ब्लॅकमेल करण्यात आले. दुपार पासून सुमारे पाच तासपर्यंत पोलीस मयूरच्या शोधात भटकत होते... संध्याकाळी अपहरण कर्त्यांनी मयूरला सोडून दिले...त्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी या अपहरणाचा तपास करीत मास्टरमाइंड सूरजला दादर येथून, शेख मतीन ला कुलाबा तर राज याला नागपुरातून अटक केली...सोशल मिडीयाचा वापर करताना तो अत्यंत सावधपणे करणे किती गरजेचे आहे ते या घटनेतून पुढे येते...