सातारा : सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कॅमेरा ट्रॅपमधील अभ्यासात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेरी नर वाघाची छायचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मे महिन्याच्या २३ व २४ तारखेला प्रकल्पातील दोन भागांमध्ये ही छायाचित्रे टिपण्यात आली. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या अंतर्गत मागील एक वर्षापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळे अभ्यास सुरू आहेत. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून टायगर रिकर्वी प्रोग्राम सुरू आहे.
ग्रीड करून पायी किंवा कॅमेरा लावून अभ्यास केला जातो. म्हणजे, दोन-दोन किमीच्या अंतरावर दहा ते पंधरा दिवस कॅमेरा लावून ठेवला जातो. या काळात त्या परिसरात आलेल्या सर्व वन्यजीवांचे परिक्षण केले जाते. त्यांचा अभ्यास केला जातो.