उदयनराजे भोसले यांची सुटका पण... एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी

 खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलाय. मात्र उदयनराजेंना एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 

Updated: Jul 25, 2017, 08:04 PM IST
उदयनराजे भोसले यांची सुटका पण... एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी  title=

सातारा :  खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन देण्यात आलाय. मात्र उदयनराजेंना एक दिवसआड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 

पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे. उदयनराजेंना जामीन मिळाल्यानंतर  त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एका उद्योजकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी उदयनराजेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आज सकाळीच उदयनराजे भोसले स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले.  

अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं उदयनराजेंना २ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. उदयन राजेंना अटक झाल्यानंतर साताऱ्यात उत्स्फूर्त बंद पुकरण्यात आला. याप्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले. कायदा हातात घेऊ नये संयम राखावा, असे आवाहन खासदार भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले.