शिवसेनेला घरचा आहेर, ज्येष्ठ नगरसेवकांचा पक्षाला वैतागून राजीनामा

शिवसेनेला डोंबिवलीत घरचा आहेर मिळाला आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर वारंवार आंदोलन आणि उपोषण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी पक्षाला वैतागून राजीनामा दिला. 

Updated: Jul 25, 2017, 06:23 PM IST
शिवसेनेला घरचा आहेर, ज्येष्ठ नगरसेवकांचा पक्षाला वैतागून राजीनामा title=

डोंबिवली : शिवसेनेला डोंबिवलीत घरचा आहेर मिळाला आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नावर वारंवार आंदोलन आणि उपोषण करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी पक्षाला वैतागून राजीनामा दिला. 

वामन म्हात्रे यांनी प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर गंभीर आरोप यावेळी केले आहेत. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे, टक्केवारी आणि सिंडीकेट रिंगमुळे केडीएमसी म्हणजे भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाल्याचा आरोपही म्हात्रेंनी केला आहे.

स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठई म्हात्रेंनी उपोषण केलं होतं. फेरीवाल्यांना हटवण्याचं सोडून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अधिका-यांकडून हप्ते घेऊन आपला आवाज दाबत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. भ्रष्टाचार आणि टक्केवारीमुळे १५-२० लाखांचं काम ५०-६० लाखांवर जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.