"...नाहीतर सोमालियासारखी अवस्था होईल"; भाषण करताना चिडलेले उदयनराजे भोसले बसले स्टेजवर

 बाईकवरून फिरणे, कॉलर उडवणे यानंतर आता उदयनराजे यांच्या कृतीने वेधलं सर्वाचं लक्ष्य

Updated: Oct 8, 2022, 01:09 PM IST
"...नाहीतर सोमालियासारखी अवस्था होईल"; भाषण करताना चिडलेले उदयनराजे भोसले बसले स्टेजवर title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. कार्यकर्त्यांच्या बाईकवरून फिरणे, कॉलर उडवणे अशा अनेक दिलखुश अदांवर त्यांचे कार्यकर्ते खुश असतात. अशातच उदयनराजे (udayanraje bhosale) यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. एका कार्यक्रमात भाषण करत असताना खासदार उदयनराजे चक्क स्टेजवर खाली बसले आणि लोकांना हातात वाडगं घ्यावं लागेल असे म्हणाले. या घटनेच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (Satara MP udayanraje bhosale sat down while giving a speech)

साताऱ्यातील (Satara) जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी तज्ञ डॉ.बुधाजीराव मुळीक आणि खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी शेतकऱ्यांचा (Farmer) प्रश्नाबाबत चिडलेल्या उदयनराजे यांनी यावेळी भाषणात बोलताना लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील. प्रशासनाला ओळखत नाही अशी परिस्थिती होवू देवू नका. नाहीतर सोमालिया सारखी अवस्था होईल आणि देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही असं म्हटलं.

त्यानंतर उदयनराजे यांनी भाषण सुरु असताना स्टेजवर खाली बसत आज आपण खुर्चीत बसतोय उद्या वाडगं घेवून बसायला लागेल, असं म्हणाले. लोकांचे कल्याण झाले पाहिजे अशीच माझी अपेक्षा आहे असं देखील उदयनराजे म्हणाले.

 

दरम्यान, या कार्यक्रमास सातारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनात पन्नासहून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये शेती विषयक अवजारे औद्योगिक विभागातील विविध उत्पादने, देशी विदेशी बियाणांचे स्टॉल लावण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. हे कृषी प्रदर्शन 7 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.