शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी...

आभाळात ढग जमा होऊ लागले की रानोमाळी मोरांचा केका कानावर येऊ लागतो.. मात्र सध्या मोर लूप्त होत चाललेत.. त्यामुळे साता-यातील एक शेतकरी मोरांच्या रक्षणासाठी झटतोय.. रोज त्यांना शेतात दाण्यांची सोय करतोय..

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 25, 2017, 04:20 PM IST
 शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी... title=

विकास भोसले, झी मीडिया, सातारा : आभाळात ढग जमा होऊ लागले की रानोमाळी मोरांचा केका कानावर येऊ लागतो.. मात्र सध्या मोर लूप्त होत चाललेत.. त्यामुळे साता-यातील एक शेतकरी मोरांच्या रक्षणासाठी झटतोय.. रोज त्यांना शेतात दाण्यांची सोय करतोय..
 

हल्ली सर्जेराव मानेंच्या शिवारात रोज मोरांचं हे असं नृत्य सुरु असतं..  आभाळात ढग जमा झाले की मोरांच्या नृत्यूला आणखीनंच उधाण येतं.. 

सातारा जिल्ह्यातील म्हसवडच्या या शेतकऱ्यानं मोरांना वाचवण्याचा विडाच उचललाय.. ते रोज सकाळी सहावाजता आपल्या शेतात मोरांसाठी चारा ठेवतात.. त्यानंतर अगदी पाच मिनिटांतच इथं मोरांचा गोतावळा जमा होतो.. दाण्यांवर ताव मारुन झाला की नृत्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंत हे मोर पुन्हा रानात परततात... गेल्या सातवर्षांपासूनचा हा नित्यक्रम आहे..

सर्जेराव मोरांना वर्षाला ५ क्विंटल खाद्य देतात.. या लूप्त होत चाललेल्या सुंदर पक्षांना वाचवण्यासाठी धडपडणा-या सर्जेरावांचं कौतुक करावं तेवढं कमीच..