शिर्डी : सरपंच यांचे मानधन पाचशे रुपयांवरून थेट पाच हजार रुपये करण्यात आले आहे. शिर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. मानधन वाढ हा ट्रेलर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सरपंचांची मानधन वाढ हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आणखी महत्वाचे निर्णय घेणार असल्याचे सूचीत केले.
Remuneration for Sarpanch increased 3 times. Many more decisions are in pipeline. We are committed for rural development and upliftment of every villager: CM @Dev_Fadnavis
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2019
शिर्डीमध्ये ४७ हजार सरपंच आणि उपसरपंचाची परिषद पार पडली. सरपंचांसाठीचं मानधन पाचशे रुपयांवरुन थेट पाच हजार करण्यात आले आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. सगळ्यांनाच आमदार व्हायचंय, पण थोडी सबुरी ठेवा, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
CM Devendra Fadnavis launched My RDD MobileApp. Sarpanch from around 25,000 villages, Jilha Parishad Presidents, CEOs attended this function. pic.twitter.com/gPu39gaE3K
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2019
राज्यातील सरपंचांचे सध्याचे मानधन वाढविण्याबरोबरच राज्यातील सर्व उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा १ जुलै २०१९ पासून लाभ मिळणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
CM Devendra Fadnavis attends concluding ceremony of State level workshop of Sarpanch & UpSarpanch organised by All India Sarpanch Council at Shirdi in Ahmednagar district. Ministers Pankaja Munde, Radhakrushna Vikhe Patil, Ram Shinde, Dadaji Bhuse were present. pic.twitter.com/uW4iHr8ooE
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2019