मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी. वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray on Sanjay Rathod) बजावलं आहे. 'मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे' या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांना बजावलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचं नाव समोर आलं आणि एकच गदारोळ झाला. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामाच्या मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. संजय राऊतांनी संजय राठोडांबाबत केलेल्या वक्तव्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मिळणार का? असं चिन्ह समोर आलं आहे. 'मी निर्णय घेण्यापूर्वी तू निर्णय घे', उद्धव ठाकरेंनी अशा कडक शब्दात संजय राठोडांना बजावलं आहे. संजय राठोड यांची अधिवेशनापूर्वी गच्छंती होणार असं दिसू लागलं आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी इथे झालेल्या गर्दीची गंभीर दखल घेत कारवाईचे सक्त आदेश दिलेत. आपल्या माणसाने नियम, कायदे मोडले तरी मुख्यमंत्री सोडणार नाहीत. कारवाई होईल असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. संजय राऊतांनी बुधवारी सकाळी या मुद्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची चिन्हं आहेत. संजय राठोड यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय, अशी सूत्रांची माहिती आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन होत असल्याचं चित्र दिसून येतं आहे. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचं मंत्रिपज धोक्यात आलं आहे.