'धर्माच्या नावार सत्ता मिळवायची आणि पेट्रोल महाग करायचं'

पेट्रोल आणि डिझेल धर्मसंकट असेल तर धर्माचे राजकारण तुम्ही करू नका असं राऊत यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

Updated: Feb 26, 2021, 02:42 PM IST
'धर्माच्या नावार सत्ता मिळवायची आणि पेट्रोल महाग करायचं' title=

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर विखारी टीका केली आहे. धर्माच्या नावार सत्ता मिळवायची आणि पेट्रोल महाग करायचं हे रामराज्यात शोभत नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पेट्रोल आणि डिझेल धर्मसंकट असेल तर धर्माचे राजकारण तुम्ही करू नका असं राऊत यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.  निवडणूक आली की किमती कमी करायच्या आणि चार वर्षे दर वाढवायच हे भाजपच धोरण आहे. सत्ताही भाजपला श्रीराम च्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे.

लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल डिझेल दरवाढ आहे. देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणं हे सरकारचं काम आहे. पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतीवरून संजय राऊत यांनी भाजप सरकारला सुनावलं आहे. 

 मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असताना राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती अर्थखात्यातील सूत्रांनी दिली आहे. 
 
 पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते. येत्या ८ मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकसल्प विधानसभेत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. 
 
 राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या राज्य सरकारने २०१८ साली पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून २ रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे. याचप्रमाणे राज्य सरकार व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारत आहे