राहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात

Thackeray Group: आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आता वरुण देसाई आणि सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय गणेश निकम यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 1, 2023, 03:13 PM IST
राहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात title=

Thackeray Group: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाणाऱ्यांची रिघ लागली आहे. विशेष म्हणजे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नेते ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करीत आहेत. नुकतेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहूल कनाल यांनी ठाकरे गटाला सोठचिठ्ठी दिली. आता लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करतील. राहूल कनाल हे वरुण सरदेसाई यांचेही जवळचे मित्र होते. दरम्यान आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. 

आता वरुण देसाई आणि सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय गणेश निकम यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

गणेश निकम हे 2009 साली सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघात उमेदवार होते. त्यांनी 2012 साली युवा सेनेत प्रवेश केला. 

2013 ते 2018 साली गणेश निकम यांची सांगली लोकसभा जिल्हा निरीक्षक नियुक्ती करण्यात आली. 

तसेच 2018 ते 2023 मध्ये त्यांना युवा सेना विस्तारक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. 

2019 मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार निवडून आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. 

ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. गणेश निकम यांच्यानंतर ठाकरे गटाचा कोणता मोहरा शिंदे गटात प्रवेश करणार? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडले

राहूल कनाल यांनी महिन्यापूर्वी युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहूल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू समजले जातात. राहुल कनाल कोअर कमिटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले आहेत. अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे. 
मविआची सत्ता असताना शिर्डी संस्थानवर कनाल यांची विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. युवा सेनेतल्या अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवा सेना सोडली होती. राहुल कनाल हे वांद्रे पश्चिममधून विधानसभेसाठी तयारी करत होते.