Vishal Patil vs Sanjaykaka Patil : सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये एकमेकांना उतरण्याचा आव्हान-प्रतिआव्हान देण्यात येत आहे. भाजपाचे खासदार संजयकाका पाटलांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याचं आवाहन दिलय, मी एकाच वेळी दोन पैलवानाबरोबर बरोबर कुस्ती करू शकतो, त्यामुळे विशाल पाटलांनी मैदानात यावं खेळीमेळीत आपण कुस्त्या करू, असं आवाहन संजय काका पाटलांनी केले आहे. तर यावर विशाल पाटलांनी देखील संजयकाका पाटलांना प्रतिआवाहन दिलंय, तुमची खरंच ताकद असेल काम असेल तर तुम्ही पक्षाचे कवच उतरून मैदानात या, मी देखील कोणत्याही कवच विना मैदानात उतरतो, एकदाची कुस्ती होऊन जाऊ दे, असं थेट प्रति आव्हान विशाल पाटलांनी दिलं आहे. त्यामुळे आता सांगलीच्या (Sangli lokSabha Constituency) कुस्तीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीतील वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. आम्ही या जागेसाठी आग्रही असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीत नेमका कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे आता सांगलीसाठी ठाकरे गट जागा सोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.
विशाल पाटील काय म्हणाले?
सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीचा उद्या निर्णय होईल, तो आमच्यासाठी चांगला निर्णय असेल. त्यामुळे उद्या गुढी देखील उभारली जाईल, असे सूचक विधान काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी केले आहे. त्याचबरोबर आघाडीच्या निर्णयानंतर जिल्हा काँग्रेसची भूमिका चर्चा करून घेतली जाईल, अशी भूमिका जिल्हा काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विशाल पाटलांनी हल्लाबोल केला आहे.आघाडीचा उमेदवारी जाहीर होण्या आधीच संजय राऊत यांचा सांगली दौऱ्याचं कारण काय ? त्यामुळे त्यांच्या सांगली दौऱ्याची शंका आहे. तसेच कोल्हापूरच्या बदल्यात सातारा, सोलापूर का मागितली नाही? 16 वेळा सांगली लोकसभा काँग्रेसने जिंकली आहे, त्यामुळे सांगलीची जागा शिवसेनेने का ? मागितली याबाबत शंका असल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळावरील समाधीचे दर्शन घेतलं. त्यावेळी सांगली लोकसभेच्या जागेवर बोलताना येत्या २४ तासात सांगलीतील विषय मार्गी लागेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.