Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये विशाल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील 7 हजार मतांनी आघाडी घेतली होती. भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.
सविस्तर निकाल थोड्याच वेळात
एक्झिट पोलने सांगलीतून विशाल पाटील विजयी होतील अंदाज वर्तवला आहे. तसं झाल्यास महाविकास आघाडीला हा मोठा धक्का असेल.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीमध्ये सांगलीमधील जागेवरुन वाद निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची परस्पर घोषणा केल्याने काँग्रेसकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान महायुतीने संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.