सांगलीतल्या आश्रमशाळेत पाच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पीडित मुलींनी निनावी पत्राद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

Updated: Sep 27, 2018, 10:32 AM IST
सांगलीतल्या आश्रमशाळेत पाच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार title=

सांगली : सांगली जिल्ह्यातील कुरलप गावात असलेल्या मिनाई प्राथमिक आश्रम शाळेत पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. मिनाई प्राथमिक आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद पवार याने पाच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. याप्रकरणी ६० वर्षांच्या अरविंद पवारला अटक करण्यात आलीय.

पोलिसांना निनावी पत्र

पीडित मुलींनी निनावी पत्राद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. चौकशीत अन्य तीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचीही माहिती पुढे आलीय. शाळेत घडत असलेल्या प्रकारांची शिक्षकांनाही कुणकुण लागली होती. पीडित मुलींनी शिक्षकांना या प्रकराची कल्पना दिली पण शिक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. 

चौकशी सुरू 

 नराधम अरविंद पवार अत्याचारापूर्वी मुलींना कसल्या तरी गोळ्या खायला देत असल्याचंही समोर आलंय. या प्रकरणात अरविंद पवार या नराधमाला मनीषा कांबेळे नावाची महिला मदत करत असल्याचंही उघड झालंय. मनीषा कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केलीय.