डॉन दाऊद इब्राहिम याच्या घरात सनातन शाळा भरणार!

Dawood Ibrahim News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Don Dawood Ibrahim ) बालपण ज्या घरात गेले तिथे आता चक्क शाळा  सुरू होणार आहे.

Updated: Oct 14, 2021, 12:03 PM IST
डॉन दाऊद इब्राहिम याच्या घरात  सनातन शाळा भरणार! title=

प्रणव पोळेकर, खेड, रत्नागिरी :  Dawood Ibrahim News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे (Don Dawood Ibrahim ) बालपण ज्या घरात गेले तिथे आता चक्क सनातन शाळा (Sanatan School) सुरू होणार आहे. नेमकं कुठे आहे हे दाऊदचं घर आणि कोण इथं शाळा सुरू करत आहे, याबाबत खास रिपोर्ट.

माफिया डॉनच्या बंगल्यात विद्येचे मंदिर पाहायला मिळणार आहे. घराच्या नव्या मालकाने तसा निर्णय घेतला आहे. मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे घर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके या गावात काही काळ दाऊदचे वास्तव्य असल्याचं सांगितलं जाते. आता या घरात चक्क सनातनची शाळा भरणार आहे. दिल्लीमधले एक वकील अजय श्रीवास्तव यांनी हे घर लिलावात विकत घेतले. त्यांनी हा दुमजली बंगला आता सनातन संस्थेला शाळेसाठी भेट दिला आहे. त्यामुळे दाऊदचं हे घर लवकरच विद्येचं मंदिर होणार आहे. (Sanatan School will be started in the house of Don Dawood Ibrahim in khed at Ratnagiri)

1980च्या दशकात दाऊद याच घरात राहात असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याचे वडील इब्राहिम अली कासकरांना पोलीस खात्यात नोकरी लागली आणि हे कुटुंब मुंबईत शिफ्ट झालं. दाऊदच्या चार बहिणींपैकी एक बहिण काही वर्षं या घरात राहात होती. मात्र इथून जवळ असलेल्या खाडीत बुडून बहीण आणि भाचीचा मृत्यू झाला. तेव्हापासून हे घर रिकामे होते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्टअंतर्गत ब-याच गुंडांच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला. त्यात श्रीवास्तव यांनी हा बंगला 11 लाख 30 हजारांना विकत घेतला. 

दाऊद इब्राहिम हा देशातल्या मदरशांना पाठबळ देत आला आहे, असे सांगितले जात आहे. आता कधीकाळी त्याचे वास्तव्य असलेल्या वडिलोपार्जित वाड्यात सनातन शाळा सुरू होणार आहे. हा नियतीनं दाऊदसोबत केलेला काव्यगत न्याय आहे.