Sambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा

Sambhaji Nagar Crime  : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.

Updated: Jan 9, 2023, 04:31 PM IST
Sambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : नात्यामध्ये एकमेकांवर विश्वास असेल तर ते बराच काळं टिकतं. पण कधी दोघांमध्ये एकमेकांबाबत अविश्वास निर्माण झाला तर ते तुटते आणि त्याचा शेवट होतो. मात्र कधी कधी त्यातून काही धक्कादायक प्रकार समोर येतात. संभाजीनगरमध्येही (Sambhajinagar News) नात्यातील अविश्वासमुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. पतीला राग इतका अनावर झाला की त्याने दोन वर्षाच्या बाळालाही सोडलं नाही.

रागाच्या भरात पत्नीसह बाळाचाही गळा आवळला

चारित्राच्या संशयावरून संभाजीनगरच्या कांचनवाडीत पतीने पत्नीचा खून (Sambhaji Nagar Crime) केल्याचा प्रकार सोमवारी समोर आला आहे. रात्री दोनच्या सुमारास पतीने पत्नी आणि अडीच वर्षाच्या बाळाचा दोरीने गळा आवळला आणि त्यांना संपवलं. या घटनेनंतर आरोपी पती सकाळपर्यंत घरातच थांबला होता. त्यानंतर सकाळी सातारा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत पत्नी आणि मुलाच्या हत्येची माहिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलली असून पुढील तपास सुरु केला आहे. फक्त चारित्र्याच्या संशयावरुन एक हसत खेळते कुटुंब उध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आईने सांगितलं तिला संपव आणि...

समीर विष्णू म्हस्के असे या आरोपीचे नाव आहे. पत्नी आणि मुलाच्या हत्येप्रकरणी समीरसह त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी समीर हा खासगी नोकरी करतो. समीर हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता. यावरुन दोघांमध्ये सातत्याने भांडण देखील होत होती. याच भांडणाचे रुपांतर वादात झाले आणि पत्नी आणि मुलाचा जीव गेला.

रविवारी रात्री सुद्धा समीरचा पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात आरोपी समीरच्या आईने मुलाची बाजू घेतली. यानंतर आईनेच पत्नी आणि मुलाला संपवून टाक असे सांगितले. त्यानंतर पत्नी आणि मुलाच्या तोंडात गोळा कोंबून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून दोघांनाही संपवलं, अशी कबुली समीरने पोलिसांकडे दिली. रात्री हा सर्व प्रकार घडल्यानंतर समीरने सकाळी पोलिसांना  112 या नंबर वर कॉल करत याची माहिती दिली. दरम्यान, या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.