आपला कोण, शत्रू कोण? हेच कळत नाही: संभाजी भिडे

ज्या देशात आपण वास्तव्याला आहोत त्याचा इतिहासाच अनेकांना माहिती नसल्याबाबतही भिडे गुरुजींनी यावेळी खंत व्यक्त केली. 

Updated: May 28, 2018, 10:37 AM IST

जळगाव: अभूतपूर्व पोलीस बंदोबस्तात संभाजी भिडे यांची सभा जळगावात झाली. सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी केलेल्या भाषणात  संभाजी भिडे यांनी आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. आपल्याला आपला कोण आणि शत्रू कोण हेच कळत नाही. ज्या देशात आपण वास्तव्याला आहोत त्याचा इतिहासाच अनेकांना माहिती नसल्याबाबतही भिडे गुरुजींनी यावेळी खंत व्यक्त केली. 

भिडे गुरुजींचे  पोलीस बंदोबस्तात व्याख्यान  

पाकिस्तानसारख्या राष्ट्राचा भारताकडून होणारा उदो उदो चुकीचा असल्याचं मत संभाजी भिडे यांनी जळगावात व्यक्त केलं. ३२ मन सुवर्ण सिंहासन खडा पहारा या विषयावर भिडे गुरुजींचे आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात व्याख्यान झालं. पाकिस्तान नेहमी सीमेवर गोळ्या झाडतो आणि आपण त्यांच्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळतो. १४ ऑगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला वाघा सीमेवर पेढे वाटतो. भारताच्या या भूमिकेवर भिडे गुरुजींनी प्रहार केला. 

राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा: भिडे गुरूजी

दरम्यान, संभाजी भिडे यांची कालच (रविवार, २७ मे) नंदुरबार येथे सभा झाली होती. यासभेत त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा आहे, कोण न्यायाधीश आणि हा सर्व नालायकपणा कशासाठी?, असा खडा सवाल करत संभाजी भिडे गुरुजींनी या साऱ्या प्रकरणावरुन समाजाला लक्ष केलं होतं. संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कुल मध्ये सभा पार पडली. सुवर्ण सिंहाण पुन संस्थापना संकल्प पूर्तता आवाहनासाठी त्यांनी नंदुरबार मध्ये ही सभा घेतली. यावेळी त्यांनी हिदुस्थान हा जगातील एक सर्वाधिक प्रभावी देश असल्याचे अनेक दाखलेही दिले.