Gautami Patil: 'नाचणारी बाई तर पाहिजे, पण...' गौतमी पाटील वादावर संभाजी भगत यांची पोस्ट चर्चेत!

Sambhaji Bhagat facebook Post:  गौतमीने पाटील आडनाव (Gautami Patil) लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. आडनावाच्या वादावर शाहीर संभाजी भगत यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

Updated: May 27, 2023, 08:44 PM IST
Gautami Patil: 'नाचणारी बाई तर पाहिजे, पण...' गौतमी पाटील वादावर संभाजी भगत यांची पोस्ट चर्चेत! title=
Sambhaji Bhagat On Gautami Patil

Sambhaji Bhagat On Gautami Patil Surname: मराठा क्रांती ठोक मोर्चाने गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरच आक्षेप घेतलाय. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार (Gautami Patil Real Surname) आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. त्यामुळे तिनं पाटील आडनाव लावू नये, असं मराठा क्रांती ठोक मोर्चाने म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली होती. गौतमीने पाटील आडनाव (Gautami patil surname) लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा थेट इशारा देखील देण्यात आला होता. त्यावर आता शाहीर संभाजी भगत (Sambhaji Bhagat) यांची फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सटकून टीका केली आहे. सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.

काय म्हणाले संभाजी भगत?

नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटतं? तर नाचणारी बाई तर पाहिजेच, पण ती आपल्या पेक्षा खालच्या जातीची पाहिजे. नसेल तर निदान ती आपल्या जातीची असता कामा नये. आज पर्यंत ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्याला जात्यंध पुरुष दुखवतो, म्हणून निदान आडनाव तरी बदला अशी मागणी होत आहे. पण या जात्यंध लोकांना हे कळत नाही की आडनाव बदलून लाज वाचणार नाही, मुळात बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावं लागणं हेच मुळापासून बंद व्हावं, असं का वाटत नाही? निदान त्यांच्या स्त्रियांना नाचून पोट भरायची वेळ आली असेल, तर ते त्या जातीतल्या स्त्रियांची स्थिती सुधारायला का पुढे येत नाहीत?, असा प्रश्न संभाजी भगत यांनी उपस्थित केला आहे.

मुळात मुद्दा नाचण्याचा नाही मुद्दा पुरुषसत्तेचा आहे, भारतीय पुरुषांची जाणीव आणि नेनिव ही दुहेरी आहे ते पुरुषसत्ताक तर आहेतच ,पण ते जात्यंध सुद्धा आहेत म्हणून बलात्कारित स्त्रीकडे सुद्धा ते अश्याच घाणेरड्या पद्धतीने बघतात, तिची जात शोधतात आणि मग काय काय करायचे हे  ठरवतात! दुसऱ्याच्या जातीच्या बाईवर बलात्कार झाला तर यांना काहीच वाटत नाही आणि जातीच्या बाईवर त्याच्या पेक्ष्या खालच्या जातीच्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर मग वस्त्याच जाळतात! बलात्कार हे हत्यार म्हणून सुद्धा वापरतात! स्त्रियांच्या बाजूने विचार करणाऱ्या प्रत्येकाने या प्रकारच्या मानसिकतेला प्रश्न विचारायला हवाच, पण आडनाव बदलून नाचा असं ज्या बाईला सांगितलं जातेय तिने सुद्धा याबाबत स्पष्टपणे व्यक्त व्हायला हवं, असं मत शाहीर संभाजी भगत यांनी व्यक्त केलंय.

पाहा पोस्ट

दरम्यान, जात मेली जात मेली जाता जाता जात नाय, असं प्रत्यक्षात घडताना अनेकदा पहायला मिळतं. गौतमीच्या वादामुळे आता जातीय समीकरण रचलं जातंय का? असा सवाल विचारला जात आहे. एकीकडे गौतमीच्या आडनावाला विरोध होत असताना, दुसरीकडं जळगावातल्या मराठा सेवा संघानं मात्र गौतमीची बाजू लावून धरली आहे. मराठा सेवा संघातर्फे गौतमी पाटीलला मराठा भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणीच करण्यात आलीये. त्यामुळे आता समाजातील दोन चेहरे आता समोर आले आहेत.

Gautami Patil काय म्हणाली?

मी या गोष्टींकडे आता लक्ष देणार नाहीये. मला कोणीही काहीही बोलतंय, पण मला फरक पडत नाही, असं गौतमी म्हणते. मी पाटील आहे मग पाटील वापरणारच ना? असं म्हणत गौतमी पाटीलने (Gautami Patil) या प्रकरणावर जास्त बोलणं टाळलं होतं. त्यामुळे आता हा विषय आणखी पेटणार की मिटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.