वेतन मुद्द्यावरून नागपूर पालिका बस कर्मचारी संघटनेचा संप

किमान वेतनाच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या बस कर्मचारी संघटनेनं आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपाचा नागरिकांवर परिणाम झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 20, 2018, 03:37 PM IST
वेतन मुद्द्यावरून नागपूर पालिका बस कर्मचारी संघटनेचा संप title=

नागपूर : किमान वेतनाच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या बस कर्मचारी संघटनेनं आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपाचा नागरिकांवर परिणाम झालाय.

अतिशय तुटपुंजा पगार 

महापालिका विविध खासगी कंपन्यांच्या माध्यमातून शहरात बस सेवा संचलित करत आहे. मात्र या कंपन्या बस कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजा पगार देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. त्यामुळे आजपासून हे बस कर्मचारी संपावर गेले आहेत.

'नियमाप्रमाणे वेतन द्या'

नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना १८ हजार वेतन मिळणे अपेक्षित असताना केवळ ७ ते ९ हजारपर्यंत वेतन दिले जात आहे. भारतीय कामगार सेनेच्या बॅनरखाली पुकारण्यात आलेल्या या बेमुदत संपात बसचे चालक, वाहक, तिकीट चेकर यांचा समवेश राहणार आहे.