Viral Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', रातोरात स्टार झालेल्या साईराजचा नवा व्हिडीओ व्हायरल!

Amchya papani ganpati anla Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', हे गाणं सध्या चांगलंच गाजलंय. तुम्हीही कोणाच्या ना कोणाच्या स्टेटसला हा व्हिडीओ पहायला मिळाला असेल. अशातच आता साईराजचा आणखी एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.

Updated: Sep 6, 2023, 04:56 PM IST
Viral Video : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', रातोरात स्टार झालेल्या साईराजचा नवा व्हिडीओ व्हायरल! title=
Sairaj Kendre Video goes viral

Sairaj Kendre Viral Video : सप्टेंबर महिना आला की सर्वांची लगबग सुरू होते ती गणरायाच्या आगमनाची...  सर्वजण ज्याची वाट पाहतायेत तो दिवस आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सोशल मीडियावर देखील भक्तीमय वातावरण झाल्याचं पहायला मिळतंय. गणशोत्सवाचे काही रिल्स (Instragram Reel) सध्या पहायला मिळत आहेत. अशातच  शाळकरी चिमुकल्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्याचं नाव साईराज कोंद्रे... साईराजच्या 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…', (Amchya Pappani Ganpati Anala) हे गाणं सध्या चांगलंच गाजलंय. तुम्हीही कोणाच्या ना कोणाच्या स्टेटसला किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ पहायला मिळाला असेल. अशातच आता साईराजचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

साईराजच्या 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'  इन्स्टा रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत 40 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. त्यामुळे साईराज रातोरात स्टार झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच या साईराजचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहुर्तावर साईराजने आणखी एक गाणं ट्रेंडमध्ये आणलंय. नजरेचा मारू नको बाण ग ...माझा जाईल प्राण ग' या गाण्यावर साईराजने रील तयार केलंय.

आणखी वाचा - 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

साईराजचा हा रिल सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या दुसऱ्या रिलमधील साईराजचा गोविंदा लुक लोकांना आवडल्याचं दिसतंय. या छोट्या गोविंदाला नेटकरी लॉट्स ऑफ लव देताना दिसतायेत. या नव्या रिलमध्ये साईराजने गुलाबी रंगाचा शर्ट घातलाय. तर गोविंदाप्रमाणे त्याने डोक्याला केसरी रंगाची पट्टी अन् मोरपिस लगावला आहे. त्यामुळे त्याचा लुक आणखीनच क्युट दिसतोय.

दरम्यान, साईराजच्या पहिल्या रिलच्या यशाचं कारण होतं त्याचे हावभाव किंवा एक्सप्रेशन. दुसऱ्या रिलमध्ये देखील त्याने हावभाव देऊन चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्याची बाण मारण्याची स्टाईल अनेकांनी पसंत केलीये. त्यामुळे दुसरा रिल देखील तुफान व्हायरल होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.