साईबाबांच्या पादुका भ्रमणाबाबत त्रिसदस्यसीय समिती घेणार निर्णय

साईबाबांंचे मंदिर हे अनेक भाविकांंचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून लोकं येथे दर्शनाला येतात. पण आता या मंदिरात एक नवा वाद रंगलाय. 

Updated: Nov 15, 2017, 12:26 PM IST
साईबाबांच्या पादुका भ्रमणाबाबत त्रिसदस्यसीय समिती घेणार निर्णय  title=

नाशिक: साईबाबांंचे मंदिर हे अनेक भाविकांंचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून लोकं येथे दर्शनाला येतात. पण आता या मंदिरात एक नवा वाद रंगलाय. 

 साईबाबांच्या पादुका शिर्डीबाहेर नेण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. मंगळवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय अपेक्षित होता. मात्र बैठकीत विश्वस्तांची एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.ही समिती पादुकांच्या विषयाबाबत मतं जाणून घेऊन दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार पादुका भ्रमणाचा निर्णय घेण्यात येईल असं साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी जाहीर केलं आहे.