सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण कर्जमाफी मागणाऱ्या नेत्यांवर आरोप

कर्जमाफी दिल्यानंतर इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आलीय.

Updated: Jun 26, 2017, 09:26 AM IST
सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण कर्जमाफी मागणाऱ्या नेत्यांवर आरोप title=

सांगली : काही जण स्वतःचं नेतृत्व अबाधित ठेवण्यासाठी कर्जमाफीला विरोध करुन कांगावा करत असल्याचं सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. 

कर्जमाफी दिल्यानंतर इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांची मिरवणूक काढण्यात आलीय. यावेळी त्यांनी शेट्टी आणि रघुनाथदादांचं नाव न घेता टीका केली. 

शेतकरी अशा नेत्यांमागे जाणार नाही असंही खोत म्हणालेत. दरम्यान, कर्जमाफीबद्दल सातारा जिल्हातील शेतकऱ्याच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला. खोत यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी येऊन आदरांजली वाहिली. 

यावेळी भाजप प्रवेशाबाबत सदाभाऊ यांनी सावध भूमिका घेतली. भाजप-शिवसेना आणि सर्व घटक पक्षांचे सरकार चांगली कामगिरी करीत असून आगामी काळात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं.