मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. रुपाली चाकणकर यांच्या रिक्त झालेल्या जागी आता कुणाची वर्णी लावण्यात येणार आहे याचीच उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या जागी प्रदेश उपाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर एके काळची मैत्रीण चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर यांच्यातील राजकीय वाद राज्यभर रंगला होता.
राज्यात भाजपचे सरकार जाऊन आघाडी सरकारची सत्ता आली. त्यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची मुदत संपल्याने ता रिक्त झालेल्या जागी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद हे अर्धन्यायिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहू नये असा अलिखित नियम आहे. रुपाली चाकणकर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी पक्षपदाची सूत्रे सोडल्यास सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या जागी आता कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.