VIDEO : वधूसोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्यानं भर मंडपात हाणामारी!

कानपूरच्या एका लग्न समारंभादरम्यान सेल्फी घेण्यावरून जोरदार हंगामा झालेला पाहायला मिळाला... हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

Updated: Feb 14, 2018, 10:47 PM IST
VIDEO : वधूसोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्यानं भर मंडपात हाणामारी! title=

कानपूर : कानपूरच्या एका लग्न समारंभादरम्यान सेल्फी घेण्यावरून जोरदार हंगामा झालेला पाहायला मिळाला... हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.

ही घटना कानपूरच्या बर्रा भागात घडलीय. लग्न समारंभात एका व्यक्तीनं नववधूसोबत जबरदस्तीनं सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. यावरून वधूकडची मंडळी जरा जास्तच चिडले... त्या व्यक्तीनंही मग जोरदार हाणामारी सुरू केली. हा प्रकार लग्नमंडपात लाथा-बुक्क्यांनी आणि चप्पल-बुटांनी मारहाण करेपर्यंत पोहचला. 

एका तरुणाची जोरदार धुलाई होताना व्हिडिओमध्ये दिसतेय. नववधू आणि वरही ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हिडिओत एक महिलाही हातात चप्पल घेऊन एकाला मारहाण करताना दिसत आहे. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.