RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे. 

Updated: Aug 13, 2022, 10:40 AM IST
RSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?  title=

Har Ghar Tiranga :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (independence day 2022) समस्त देशवासियांना आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवर (Soicial Media) तिरंगा (Tricolor) असलेला डीपी (Display Picture)  लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर काँग्रेसने (Congress) आपल्या ट्विटर अकाऊंटवर (Twitter Account) तिरंगा हातात असलेल्या जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांचा फोटो लावला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून DP बदलला नव्हता, त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे. 

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. 52 वर्षे संघाने आपल्या मुख्यालयावर तिरंगा का फडकवला नाही? खादीचे राष्ट्रध्वज बवणाऱ्यांपासून जगण्याचं साधन का हिरावलं जात आहे? चीनकडून मशीन निर्मित आणि पॉलिस्टरचे झेंडे आयात करण्याला परवानगी का देण्यात आली? असे प्रश्न राहुल गांधी यांना विचारले होते. तसंच आरएसएसने आपल्या मुख्यालयावर 52 वर्षात कधी तिरंगा फडवला नाही आणि आता ढोंग रचलं जात आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

मोहन भागवतांच्या ट्विटरवर तिरंगा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या सर्व सोशल मीडिया उकाऊंटच्या डीपीवर तिरंगा लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटच्या डीपीवर तिरंगा ठेवला आहे. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह दत्तात्र होसबळे, मनमोहन वैद्य आणि अरुण कुणार यांनीही आपल्या डीपीवर तिरंगा ठेवला आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा लावून हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) ही मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे.