पंढरपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी, काँग्रेस नेते नारायण राणे यांचा निर्णय ते स्वतःच जाहीर करतील. मात्र तोपर्यंत ते काँग्रेसवासी आहेत, असं वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला आले होते, यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
अशोक चव्हाण नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेवर म्हणाले, 'नारायण राणे जेष्ठ नेते असल्याने याबाबतचा खुलासा तेच करू शकतील. मात्र सध्या तरी ते काँग्रेसवासीच आहेत. जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये आहेत, तोपर्यंत त्यांच्याबाबत मी वक्तव्य करणं, योग्य ठरणार नाही'.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी 26 ऑगस्ट रोजी नारायण राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो नितेश राणेनी ट्विट केला. यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आणखी उधान आलं आहे.