डोकलाममध्ये मृत्यू झालेल्या जवान रामनाथ हाकेंवर अंत्यसंस्कार

डोकलाममध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या रामनाथ महादेव हाके यांच्या पार्थीवावर त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated: Aug 27, 2017, 08:23 PM IST
डोकलाममध्ये मृत्यू झालेल्या जवान रामनाथ हाकेंवर अंत्यसंस्कार  title=

लातूर : डोकलाममध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या रामनाथ महादेव हाके यांच्या पार्थीवावर त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. रामनाथ हाके हे बीएसएफचे तांत्रिक अभियंता म्हणून डोकलाममध्ये सेवा बजावत होते.

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या मशनेरवाडी इथले रामनाथ हाके रहिवासी होते. पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडी इथे ते बीएसएफ तुकडीत कार्यरत होते. त्यानंतर डोकलाम इथे १८ हजार फूट उंचीवर कर्तव्य बजावत असताना मेंदूत अतिरक्तस्त्राव म्हणजेच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला.

रामनाथ हाकेंच्या निधनाचं वृत्त कळताच, मशनेरवाडीसह लातूर जिल्ह्यावर शोककळा पसरली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला रामनाथ महादेव हाके यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.