राज्यातील आणखी एका जिल्ह्यात निर्बंध कडक; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

 या जिल्ह्यात आजपासून दवाखाने, मेडिकल, गॅसपुरवठा वगळता अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे.

Updated: Apr 19, 2021, 09:49 AM IST
 राज्यातील आणखी एका जिल्ह्यात निर्बंध कडक; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश title=
representative image

 जालना : राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर प्रशासन आपआपल्या पातळीवर निर्णय घेत आहे. जालना जिल्हाधिकाऱ्यांनी नविन आदेश काढला आहे.  त्यानुसार या जिल्ह्यात आजपासून दवाखाने, मेडिकल, गॅसपुरवठा वगळता अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे.

  जालना जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध  कडक केले आहे. रेस्टॉरंट, बार, हॉटेल्समधून पार्सल सेवा सकाळी 7 ते रात्री 8  वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 
  
 जिल्ह्यातील परवानगी दिलेले खासगी कार्यालये वगळता इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहे.
 
 किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दुध केंद्र आदी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना निर्बंधांचा आढावा घेणं गरजेचं आहे.