नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील पोलीस आता हायटेक झाले असून, विविध गुन्ह्यांविषयीची पोलिसांत तक्रार देण्यासाठी नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेचा विस्तार करीत नागपूर पोलीस दलामार्फत सिटीझन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर के वेंकटेशम यांनी या सुविधेचा शुभारंभ केला. नागरिकांच्या सुविधेकरिता पोलीस विभागातर्फे १०० क्रमांक,व्हाट्सएप क्रमांक सारख्या सुविधा सुरु असताना उन्नत तंत्रज्ञानाचा वापर करीत ऑनलाईन तक्रार नोंदणी करता सिटीझन पोर्टल सुरु करण्यात आलं आहे.
पोर्टल उघडल्यावर नागरिकांना स्वतःची माहिती दाखल करून आपली तक्रार नोंदवायची आहे. तक्रारीची दखल संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात येईल. पोलीस कर्मचार्याकडून ताक्रीरीची शहनिशा आणि वर्गवारी केल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.ऑनलाईन तक्रारीवर कारवाई करण्यास दुर्लक्ष केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.
सिटीझन पोर्टल हे मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध राहणार आहे.