शिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध

यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Updated: Nov 4, 2017, 10:36 PM IST
शिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन दौऱ्यात नेण्यात ग्रामस्थांचा विरोध title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : यंदाचे वर्ष हे शिर्डी साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. या निम्मीत्ताने साईबाबा संस्थांनामार्फत साईबाबांच्या मूळ चरण पादुकांचा भारत भर दर्शन दौरा आयोजीत करण्यात आला आहे. मात्र साईंच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

साईंच्या पादुका शिर्डीतच साईभक्तांचा दर्शनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे. येत्या 6 नोहेबर रोजी साईच्या पादुका चेन्नई येथे नेल्या जाणार आहेत. साई संस्थानाने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा अशी मगाणीचे निवदेन संस्थान प्रशासनाला पु्न्हा देण्यात आले असून, साईंच्या पादुका बाहेर नेण्याच प्रयत्न केल्यास या पादुका अडवण्याच इशार शिर्डीतील ग्रामस्थांनी आज व्यक्त केला आहे.

साईबाबांच्या प्रचार प्रसारासांठी साईंच्या पादुका देश-विदेशात नेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आले. यात काही दिवसांपूर्वी पादुका गोव्यासारख्या राज्यात नेण्यात आल्या. त्या नंतर हवाई सफर करत पादुका दिल्लीत नेल्या गेल्या. या वेळी पादुकांच पावित्र राखल गेलं नाही असा नागरिकांचा आरोप आहे. साईबाबांच्या पुजाऱ्यांनी किंवा भालदार चोपदारांनी साईंच्या पादुका सांभाळण्या एैवजी त्या शर्ट पँट वर असलेल्या काही भक्तांच्या डोक्यावर दिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साईबाबांची ख्याती देश विदेशातल पसरलेली आहे. त्यामुळे केवळ साईंच्या समाधी शताब्दी वर्षाचा प्रचार करण्याची गरज असतांना सवंग लोकप्रियता मिळविण्याचा उद्देशाने ब्रँड अंबेसीडर नेमण्याच निर्णय संस्थानला मागे घ्यावा लागला आहे. आताही ग्रामस्थांच्या विरोधा नंतर साईंच्या पादुकांचा अमेरीका दौरा रद्द करावा लागला आहे. मात्र देशभरातील दौऱ्याबाबत साईंसस्थानाने अद्याप निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे येत्या 6 नोहेबर रोजी नियोजीत चेन्नई दौर्यात जाणाऱ्या साईंच्या पादुका रोखण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय.