RBI | रिझर्व्ह बॅंकेकडून 'या' बँकेचं लायसन्स रद्द

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

Updated: Feb 3, 2022, 10:01 PM IST
RBI | रिझर्व्ह बॅंकेकडून 'या' बँकेचं लायसन्स रद्द title=

मुंबई : आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बँकेचं लायसन्स रद्द केलं आहे. तसंच यापुढे कोणतंही व्यवहार करु नये, अशी ताकीदही या बँकेला देण्यात आली आहे. पुरेसा निधी नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. (rbi cancel nashik based independence co operative bank license)

आरबीआयने उत्तर महाराष्ट्रातील नाशिकटच्या इंडिपेंडन्स सहकारी बँकेवर ही कारवाई केली आहे. आरबीआयने  इंडिपेंडन्स सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आजपासून बँकेला कोणताही व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.