राऊतांनी दिला फडणवीसांना खोटं न बोलण्याचा सल्ला; काय म्हणाले संजय राऊत?

सागर बंगल्यावर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जवाब नोंदवला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीस यांनाही सल्ला दिलाय.

Updated: Mar 13, 2022, 06:06 PM IST
राऊतांनी दिला फडणवीसांना खोटं न बोलण्याचा सल्ला; काय म्हणाले संजय राऊत? title=

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना शिवसेनेचे संजय राऊत यांनी ट्विट करून उत्तर दिलंय. फडणवीस खोटं बोलू नका असं उत्तर राऊत यांनी दिलंय.

पोलीस बदली घोटाळा प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदविला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. ‘मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. कुठे बोलवायचं तिथे बोलवा, मी यायला तयार आहे.'

 

पण, संजय राऊत घाबरून रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात. पत्रकार परिषदेत, मला का बोलावलं? मला का बोलावलं? असं विचारतात. याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती.