रत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका

न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली. 

Updated: Dec 30, 2017, 09:08 AM IST
रत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका title=

रत्नागिरी : न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली. 

यापूर्वीच न्यायालयाने प्रशांत पारकर, अनिल मयेकर आणि संदेश पेडणेकर या पाटील बुवाच्या तीन साथिदारांची जामिनावर मुक्तता केली होती. दरम्यान अटक केल्यापासून १००दिवसानंतर पाटीलबुवाची सुटका झालीय. मात्र जामीन देताना न्यायालयाने काही अटी पाटीलबुवासमोर ठेवल्यात. 

झरेवाडीत प्रवेश करायचा नाही. धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करायची नाही. सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही. तसेच खटल्याच्या प्रत्येत तारखेला न्यायालयात हजर रहायचे अन्यथा जामीन रद्द करण्यात येईल असं कोर्टानं ठणकावून सांगितलंय.