ट्रक टर्मिनल वादात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनची उडी

नगर परिषदेच्या वादात सापडलेल्या प्रस्तावित ट्रक टर्मिनलच्या विषयात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनने उडी घेतली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 2, 2017, 09:01 AM IST
ट्रक टर्मिनल वादात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनची उडी title=

रत्नागिरी : नगर परिषदेच्या वादात सापडलेल्या प्रस्तावित ट्रक टर्मिनलच्या विषयात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनने उडी घेतली आहे. 

 ८० गुंठे जागेत ट्रक टर्मिनस?

पन्नास टक्के बिल्डर आणि पन्नास टक्के जागेत ट्रक टर्मिनस विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात ८० गुंठे जागेत ट्रक टर्मिनस उभे केले जाणार आहे का हे अद्यापही स्पष्ट नाही. 

टर्मिनस उभारण्याचा देखावा 

केवळ टर्मिनस उभारण्याचा देखावा करून वाढीव एफएसआय बिल्डरच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमनमताने ही प्रक्रिया सुरू आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

 रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा

या विरोधात रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा असोसिएशनचे  अध्यक्ष विकास सावंत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिला.