सिंधुदुर्ग : नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील शक्तीप्रदर्शनात कालिदास कोळंबकर यांची दांडी मारली आहे. राणे यांचे खंदे समर्थक कोळंबकर गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
२१ सप्टेंबरलाही मतदारसंघात घटस्थापनेच्या कार्यक्रम असल्यामुळे कोळंबकर राणेंच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकणार नाही असे झी 24 तासने संपर्क केला असता कोलंबकर यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे काल शक्तीप्रदर्शनाला उपस्थित राहू शकलो नाही असं कोळंबकरांनी म्हटलं आहे.
जर राणेंनी काँग्रेस सोडली तर तुम्ही बरोबर असणार का ? या प्रश्नावर कोळंबकर म्हणाले की, 'त्यावेळीची परिस्थिती दाखवेल मी नेमका कुठे
आहे ते !'