मुंबई : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील नाणीज (Nanij) येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थानने (Narendracharya Maharaj Sansthan) अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीसाठी मोठा निधी दिला आहे. श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी 2 कोटी 53 लाख रुपयांचा निधी बुधवारी समारंभपूर्वक दिला. हा निधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ( 2 crore 53 lakhs from Narendracharya Maharaj Sansthan for Ram Mandir)
दरम्यान, नरेंद्रचार्य महाराज संस्थानने याआधीही आपली सामाजिक बांधिकलकी जपली आहे. नरेंद्रचार्य महाराज संस्थानने यापूर्वी कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीवेळीही शासन आणि लोकांना भरीव मदत केली आहे. आता अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. यासाठी देशात निधी संकलीत करण्यात येत आहे. असे असताना नरेंद्रचार्य महाराज संस्थानने राम मंदिर उभारणीसाठी आपला हातभार लावला आहे.
राम मंदिरासाठी गेल्या महिन्यापासून देशभरात निधी, देणगी जमा करण्यासाठी मोहीम सुरू आहे. (Ram Mandir Fund) या मोहिमेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राम मंदिरासाठी घरोघरी जात मंदिर उभारणीसाठीचा निधी गोळा करत आहेत. राम मंदिर न्यासाने यासाठी भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये खाती उघडली आहेत.
दरम्यान अनेक जण सढळ हस्ते राम मंदिरासाठी निधी देत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही हजारो हात राम मंदिराला देणगी देण्यासाठी पुढे आले आहेत. नरेंद्रचार्य महाराज संस्थानकडून भरघोस निधी देण्यात आला आहे. प्रत्येक संकटात मदतीसाठी पुढे असणाऱ्या नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थाननेही राम मंदिरासाठी भरघोस निधी देत आपली सामाजिक बांधिलकी अधिक जपली आहे. 2 कोटी 53 लाख 24 हजार 152 रुपयांच्या निधीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे नरेंद्रचार्य महाराज ((Narendracharya Maharaj) यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.