...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा  26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. 

राजीव कासले | Updated: Sep 26, 2024, 02:45 PM IST
...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर title=

Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं आहे. तर शिवप्रेमी संतप्त झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जयदीप आपटे (Jaideep Apte) या तरुण शिल्पकाराने बनवला होता. पण राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी कोसळला. भारतीय नौदल दिनानिमित्त म्हणजेच 4 डिसेंबर 2024 रोजी या पुतळण्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं.

चौकशी समितीचा अहवाल

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशीची समितीची स्थापना केली होती. यात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने आता आपला अहवाल सादर केला आहे. चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, पुतळ्याला गंज लागला होता तसंच कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. पुतळा दुर्घटनेला एक महिला पूर्ण झाला असून चौकशी समितीने सोळा पाणी अहवाल सादर केला आहे.

शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम शिल्पकार जयदीप आपटेकडे देण्यात आलं होतं. तर पुतळा आणि पायासाठी संरचना सल्लागार म्हणून चेतन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

जयदीप आपटेला अटक

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली. कल्याणमधून त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली. जयदीपला अटक करण्यात आल्यानंतर आज त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार होता. पण आपल्या कुटुंबीयांना भेटायला आला असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आलं.

शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

राजकोट किल्ल्यावर आता आता छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरला जाणार आहे. हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष याला काहीच होणार नाही अशी माहिीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. पुतळा कोसळल्या नंतर या संदर्भात दोन कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. एक कमिटी पूर्वीच्या पुतळा दुर्घटना नेमकी कशी झाली याची चौकशी करणार आहे. तर, दुसरी कमिटी नव्याने पुतळा कशा स्वरुपाचा असेल, संदर्भात काम करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा असणार आहे. गुजरातमधील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी जे निकष ठेवले होते, त्याच निकषांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे.