शिवसेनेला मोठा धक्का, देवळेकरांचे महापौर पद रद्द

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. 

Updated: Nov 30, 2017, 06:54 PM IST
शिवसेनेला मोठा धक्का, देवळेकरांचे महापौर पद रद्द title=

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा आदेश कल्याण सत्र न्यायालयानं दिलाय.

दोन जातवैधता प्रमाणपत्र लावल्यानं न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. दरम्यान, याविरोधात उच्च न्यायालयाता आव्हान देण्यासाठी देवळेकर यांना एक महिन्याची मुदत देण्यात आलीय.