राज ठाकरे कार्यकर्त्यांसाठी १८ नोव्हेंबरला पुन्हा मैदानात

कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे, एका अर्थानं कार्यकर्त्यांसाठी ढाल बनून राज ठाकरे ठाण्याच्या मैदानात जाहीर सभा घेणार आहेत.

Updated: Nov 9, 2017, 02:12 PM IST
राज ठाकरे कार्यकर्त्यांसाठी १८ नोव्हेंबरला पुन्हा मैदानात title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, ठाणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १९ नोव्हेंबर रोजी ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. कोणतीही निवडणूक नसताना राज ठाकरे यांनी ही सभा फक्त, आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे, एका अर्थानं कार्यकर्त्यांसाठी ढाल बनून राज ठाकरे ठाण्याच्या मैदानात जाहीर सभा घेणार आहेत.

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर, बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल केले आहेत, याला उत्तर म्हणून राज ठाकरे हे ठाण्यात सभा घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अधिकच आक्रमक आहेत, मात्र रेल्वे प्रवाशांना मनसेचं आंदोलन स्टेशन मोकळी होत असल्यानं नक्कीच हायसं वाटतंय.

अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. ठाण्यात 18 नोव्हेंबरला सायंकाळी राज ठाकरे यांची सभा होईल.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधी आंदोलनातील पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून सूडबुद्धीने कारवाई केली, असा आरोप मनसे नेत्यांचा आहे. कार्यकर्त्यांवर चॅपटर केसेस आणि १ कोटींचा जामीन मागितला आहे.

मनसे कार्यकर्त्यांवर तडीपार कारवाई करण्याच्याही पोलिसांच्या हालचाली सुरू असल्याचंही सांगण्यात येत आहे. पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.