मुंबई : महाराष्ट्रातील 27 आरटीओमध्ये वाहन फिटनेस चाचणी बंद करण्यात आली आहे.
250 मीटरचे टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यानं आरटीओनं हा निर्णय घेतला आहे. मात्र वाहन चालकांना या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. त्यांना फिटनेस टेस्टसाठी मोठी डोकेदुखी होणार आहे. वाहनचालकांना आता फिटनेस टेस्टसाठी त्यांचं वाहन 100 ते 500 किमी लांब घेऊन जाऊन ज्या आरटीओमध्ये हे ट्रॅक उपलब्ध आहेत. तिथे फिटनेस टेस्ट करावी लागणार आहे.
उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार 250 मी ट्रॅकवर फिटनेस चाचणी बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यानं हे ट्रॅक तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे ज्या आरटीओमध्ये हे ट्रॅक उपलब्ध आहेत तिथेच ही फिटनेस टेस्ट करता येणार आहे.