Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण...

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला.2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली. 

Updated: Jan 18, 2023, 12:43 PM IST
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द, पण... title=
Raj Thackeray in Beed

Raj Thackeray Latest News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) परळी कोर्टात हजर झालेत. न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांचा अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केला. त्याचवेळी त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला. 2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. (Latest Political News in Marathi) त्याप्रकरणात राज ठाकरे यांनी कोर्टात हजेरी लावली. त्याआधी राज ठाकरे यांनी गोपीनाथ गडावर मुंडेंच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. (Maharashtra Political News

 पुणे, मुंबई, परळीतील वकिलांची टीम सोबत

या सुनावणीसाठी पुणे, मुंबई, परळीतील वकिलांची टीम राज ठाकरे यांच्यासाठी उभी होती. राज ठाकरे कोर्टासमोर पाच मिनिट उभे होते. त्यांना 500 रुपये दंड करताना त्यांचा अटक वॉरंट रद्द केला. परळी शहरातील कोर्ट परिसरात राज ठाकरे दाखल झाल्यानंतर कोट परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती. यावेळी साहित्याची नासधूस झाली. कार्यकर्त्यांच्या गोंधळामध्ये साईड रेलिंग तुटल्या. यावेळी कोर्ट परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कोर्ट परिसरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी 

परळी कोर्ट परिसरामध्ये राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. यावेळी घोषणाबाजी न करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना विनंती केलीय. त्याचवेळी कोर्ट परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज ठाकरे कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. कोर्टामध्ये राज ठाकरे यांना नेत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजुला करताना धक्काबुक्की झाली. त्यामुळे थोडा गोंधळ उडाला होता.

म्हणून कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले 

राज ठाकरे हे बसवर दगडफेक केल्या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन मिळविसाठी ते आज (Parli) परळी कोर्टात हजर राहिलेत. आता त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्या असून आता ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी दीड वाजता ते परत मुंबईला रवाना होणार होतील.

2008 मध्ये मध्ये राज‎ ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद बीडमधील परळी येथेही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎