मुंबई : महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यानं झालेल्या हानीची पुनरुवृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत पोहोचलेत. यावेळी ते साडाझडती घेतात का, याचीही उत्सुकता आहे. ते दोन दिवस ठाण मांडून बसणार आहेत.
डोंबिवली जिमखान्यात सकाळी साडे ऩऊच्या सुमारास राज ठाकरेंचं आगमन झालं. आज दिवसभर राज ठाकरे शहरातली नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी राज ठाकरे पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवलीत मनसेचे ९ नगरसेवक आहेत. तर एक नगरसेवक मनसेच्या पाठिंब्यावर निवडून आलाय. त्यामुळे मनसेकडे सध्या १० नगरसेवक आहेत. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नगरसेवकांची कल्याण-डोंबिवली फोडाफोडी होण्याची शक्यता बघता. पक्षाची एकजूट कायम ठेवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जातोय.