Raj Thackeray | औरंगाबादमध्ये होणाऱ्या मनसेच्या जाहीर सभेला अखेर परवानगी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे.

Updated: Apr 28, 2022, 08:37 PM IST
Raj Thackeray | औरंगाबादमध्ये होणाऱ्या मनसेच्या जाहीर सभेला अखेर परवानगी title=

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता होती. तसे संकेत गृहमंत्र्यांनी देखील दिले होते.  

औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार मिळाल्याने राज ठाकरे यांच्या या सभेची उत्सूकता राज्याच्या जनतेमध्ये आहे. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 1 मे रोजी ही जाहीर सभा होणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मनसेकडून मैदानावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मनसेने सभेसाठी १५ हजाराहून अधिक खुर्च्या मागवल्या आहेत. मनसेकडून या सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे.

सभा घेणारंच या भूमिकेवर मनसे ठाम होती. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर मनसेकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरु झाली होती. राज ठाकरे यांच्या या सभेबाबत मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सूकता आहे. राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात घेतलेली भूमिका सध्या देशात चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे काढण्याचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे काढले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.