ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
मनसेतर्फे फेरीवाल्यांविरोधात सुरु केलेल्या आंदोलनानंतर ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनीही स्टेशन परीसरात आंदोलन केलं. ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्या जामिनासाठी तब्बल १ कोटींची हमी मागण्यात आली होती.
या प्रकरणी राज ठाकरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, अविनाश जाधव यांच्या जामिनासाठी १ कोटी मागितल्या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना विचारलं असता "मी ठरवेन किती जामीन मागायचा ते".
राज ठाकरे यांनी पुढं म्हटलं की, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंगांना मी सांगतो हिम्मत असेल तर आया बहिणींवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांना अटक करून दाखवा, त्यांच्याकडे कोटीचे जामीन मागून दाखवा.