मनमाडमध्ये गारा, येवल्यात पावसाने कांद्यांचं नुकसान

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा

Updated: Jun 7, 2019, 07:13 PM IST
मनमाडमध्ये गारा, येवल्यात पावसाने कांद्यांचं नुकसान title=

नाशिक : मनमाड आणि परिसरात दुपारच्या सुमारास वादळीवाऱ्यांसह गारांचा पाऊस झाला. सकाळ पासून वातावरण कधी ढगाळ होते. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. विजांचा कडकडाट सुरु होऊन सुरवातीला गारा आणि ऩंतर जोरदार वारे वाहू लागले. या वादळी वाऱ्यामुळे काही झाडे उन्मळून पडली.

येवला तालुक्याच्या पूर्व भागात आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून मान्सूनपूर्व पाऊस झाला. दीड तासांहून अधिक काळ जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. कांदा व्यापाऱ्यांचा कांदा शेडचा भाग ओला झाला. कांदा ओला झाल्यामुळे शेडसह कांद्याचे अंदाजे वीस लाख रुपयेचे नुकसान झाले.

मात्र या पावसामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेत तयार करून मका, कापूस, भुईमूग, मूग, बाजारी, सोयाबीनसह आदी पीक लागवडीसाठी फायदा होणार आहे.

<