भिवंडी : भिवंडी शहरात मागील पाच सहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह जवळपास एक तास हजेरी लावली.
या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. तसेच नरपोली भागातील नार्दन इंडिया पेट्रोल पंपाजवळ असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने झाड गॅरेजवर पडलं.
या दुर्घटनेत लल्लन यादव आणि इम्रान अन्सारी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झालेत.