Schools Closed in Thane: हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांना पुढील 24 तासांकरीता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान ठाण्यात अतिवृष्टीमुळे सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार, पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाची सूचना pic.twitter.com/O77yVt4xjy
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) July 25, 2024
ठाणे मनपा शाळा, खाजगी अनुदानित, अशतः अनुदानित व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सर्व.
विषयः अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत.
संदर्भः हवामान विभागाकडून ऑरेज अॅलर्ट.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ 1 ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना दि.26/7/2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
उपरोक्त बाबत सर्व विद्यार्थ्यांना व पालक यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ अवगत करावे.
(ज्योत्स्ना शिंदे-पवार) शिक्षणाधिकारी
ठाणे महानगरपालिका, ठाणे.
उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांना पुढील 24 तासांकरीता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असं मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आलं आहे.