अलिबाग : रायगड (Raigad ) जिल्ह्यातील सावित्री नदी ( Savitri river ) पात्रातील वाळू माफियांचा अड्डा (sand mafia) पोलिसांनी (Raigad Police ) उध्वस्त केला केला आहे. वाळू उत्खननास बंदी असताना आणि लॉकडाऊनचा फायदा घेत रात्री वाळूची चोरी वाळूमाफियांकडून करण्यात येत होती. पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झालेत. पोलिसांनी दोन डंपर , जेसीबी , कुदळ , फावडे असा 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. (Police action has scarred the sand mafia.)
रायगड - पोलीस आणि महसूल यंत्रणा लॉकडाऊनच्या बंदोबस्तात गुंतली असताना त्याचा फायदा घेत महाडमध्ये वाळूमाफियांचा हैदोस सुरु आहे . मात्र आता त्यांच्या या कारवायांना महाड पोलिसांनी दणका दिलाय . डीवायएसपी नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार खिंड इथला वाळू माफियांचा अड्डा उध्वस्त करीत सहा जणांच्या अटक केली. नीलेश दीपक वारंगे , निखिल रमाकांत हजारे , अजय विजय चव्हाण , जुनेद महामुद जलाल , द्वारकानाथ बगाडे , वसंत देशमुख , फिरोज अमान कुंठे , सचिन शंकर सर्कले अशी अटक केलेल्या वाळूमाफियांची नावे आहेत.
या कारवाईत पोलिसांनी दोन हायवा डंपर , जेसीबी , कुदळ , फावडे , घमेले , चाळणी आणि इतर साहित्य मिळून तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. वाळू उत्खननास बंदी असतानाही सावित्री नदीपात्रात बिनबोभाट पणे रात्रीच्या अंधारात बेकायदा वाळू उपसा सुरू होता. डीवायएसपी नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाड पोलिसांनी तिथं धाड टाकली. त्यात हा चोरीचा धंदा उघडकीस आला पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गौण खनिज अधिनियम , पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केलाय आहे. यापुढे महाड आणि परिसरात वाळू चोरांविरुद्ध कारवाई आणखी कडक करण्यात येईल, असे डीवायएसपी नीलेश तांबे यांनी सांगितले.