डोंबिवली : गांधी जयंती निमित्त राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे गांधींच्या पुतळ्यासमोर भाजप सरकार विरोधात मौन आंदोलन सुरू असताना राडा पाहायला मिळाला. डोंबिवली तर कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने महात्मा गांधी उद्यानात मौन आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे दोन मातब्बर पदाधिकारी आपापसात भिडले.
माजी शहर अध्यक्ष राजेंद्र नांदोसकर आणि माजी जिल्हा कार्याध्यक्ष विलास म्हात्रे यांच्या हा वाद उफाळला आणि जोरदार वादावादी झाली. कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादीला आधीच घर घर लागली आहे. मागिल लोकसभा, विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तसेच वरिष्ठ नेत्यांच्या मनमाणीला कंटाळून डझनभर नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठी दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची वाताहत झाली होती. त्यानंतरही पदाधिकऱ्यांनी बोध घेतला नसल्याचे आजच्या राड्यावरून दिसून आले.