अहमदनगर : हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील २२५ एकर जमीनीवर शेतकऱ्यांनी आज पुन्हा ताब्यात घेतलाय.
यासाठी काळी आई मुक्ती संग्राम संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आंदोलन करुन जमिनीचा ताबा घेतला. यावेळी शेतकरी बैलगाड्या, ट्रक्टर, शेतीची अवजारे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनिमध्ये उद्यापासून शेती करण्यात येणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करुन परदेशात पळालेल्या नीरव मोदी यला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी जोरदार दणका दिलाय. नीरव मोदीची कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमीन जप्त करण्यात आली होती. ही जमीन शेतकऱ्यांनी ताब्यात घेत प्रतिकात्मक आंदोलन केले शेतकऱ्यांनी जवळपास १२५ एकर जमीन ताब्यात घेतली.
मोदीने घेतलेली ही जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी येथील पीपल्स हेल्पलाइन संघटनेने 'काळी आई मुक्ती संग्राम'असे आंदोलन केले. शनिवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ट्रॅक्टरने नांगरणी केली.